
दैनिक स्थैर्य । दि. ०५ एप्रिल २०२३ । फलटण । फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचा बिगुल नुकताच वाचलेला आहे. दि. 3 रोजी नामनिर्देशित पत्र म्हणजेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटचा दिवस होता. त्या दिवशी 18 जागांसाठी 121 अर्ज दाखल झालेले आहेत या अर्जाची छाननी आज होणार आहे. आज होणाऱ्या छाननी मध्ये कोणाचा अर्ज बाद होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.

