दैनिक स्थैर्य | दि. १४ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
बरड (ता. फलटण) गावच्या हद्दीत शाळकरी मुलीचा विनयंभग केल्या प्रकरणी तिघांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश बंडू मदने, यश राजेंद्र आडके व सौरभ राजेंद्र लोंढे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, दि. ११ ऑटोबर २०२३ रोजी सायंकाळी ५.१५ वाजता बरड गावच्या हद्दीतील महादेव मंदिराजवळ सौरभ लोंढे याने पीडित शाळकी मुलीस बोलावून घेतले. तसेच यश राजेंद्र आडके याने तिचा उजवा हात धरून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिला ‘तुला हो म्हणायचे की नाही, नाहीतर मी तुझ्याकडे बघतो’ असे म्हणून दमदाटी केली व सायंकाळी शाळेतून घरी येत असताना ओढणी धरून ओढली आणि हो किंवा नाही शेवटचे सांग, असे म्हणाला. तसेच गणेश बंडू मदने व यश राजेंद्र अडके हे दोघे पीडितेला शाळेत जाता येता मारुती मंदिराच्या कोपर्यावर व चौकात उभे राहून डोळा मारून खुणवात होते, अशी तक्रार पोलिसात देण्यात आली आहे.
या घटनेचा अधिक तपास पोलीस उपअधीक्षक राहुल धस करत आहेत.