
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश माध्यम प्रमुख पदी गोविंद येतयेकर आणि सह माध्यम प्रमुख पदी ओम प्रकाश चौहान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
स्थैर्य, मुंबई, दि. 09 एप्रिल : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश माध्यम प्रमुख पदी गोविंद येतयेकर तर सह माध्यम प्रमुख पदी ओम प्रकाश चौहान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांना या संघटनात्मक नियुक्तीचे पत्र देण्यात आले. मान्यवरांची उपस्थिती प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी येतयेकर आणि चौहान यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपचे सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस सुनील राणे आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक उपस्थित होते.
