स्कूलबसेस व बस चालकांची तपासणी करावी; पोलीस मित्र परिवार समन्वय समितीची मागणी


 

स्थैर्य, फलटण, दि.28 : सर्व शासकीय व खाजगी शाळांच्या स्कूलबस व वाहन चालकांची चौकशी करुन दोषी आढळणार्‍यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष सुभाष गायकवाड व चिमा गायकवाड यांनी रस्ते वाहतूक विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ने – आण करण्यासाठी स्कूलबसेस आहेत. अशा स्कूलबसेसच्या दुरावस्थेमुळे अपघात होवून चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवास धोका संभवतो. त्यामुळे संबंधित यंत्रणेने अशा बसेसची पीयुसी, इन्शुरन्स, बसचे टायर, वाहन चालकाचा परवाना इत्यादी बाबींची तपासणी करावी. दोषी आढळणार्‍यांवर तात्काळ योग्य ती कारवाई करावी.

ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष वारी, आमदारांच्या दारी

सदर मागणीचे निवेदन गायकवाड यांनी रस्ते वाहतूक विभागाकडे पाठवून याबाबतचे आदेश राज्यातील सर्व जिल्ह्यात संबंधित यंत्रणेला निर्गमित करावेत अशी मागणी केली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!