आयडीएफसी तर्फे मुधोजी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप


दैनिक स्थैर्य । दि.१२ फेब्रुवारी २०२१ । फलटण । आयडीएफसी या खाजगी क्षेत्रातील बँकेने आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत असताना शिक्षण क्षेत्रातील कोविडग्रस्त कुटुंबातील पाल्यांना शिक्षणासाठी मदत व्हावी या उद्देशाने प्रत्येक विद्यार्थ्याला पाच हजार रुपये प्रमाणे तीन विद्यार्थ्यांना एकूण पंधरा हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती आपल्या सीएसआर फंडातून मंजूर केली त्यामध्ये कु. साक्षी अहिवळे (बीए भाग 1), जयश्री नाळे (बीकॉम भाग 1) व ज्ञानेश्वरी निंबाळकर (बीसीएस भाग 1) या विद्यार्थिनींना या स्कॉलरशिप चा लाभ मिळाला.

दिनांक 10 फेब्रुवारी रोजी बँकेचे सीएसआर विभागाचे व्यवस्थापक जॉन पॉल अशोक यांच्या हस्ते चेकचे वितरण करण्यात आले. त्यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. एच. कदम, पालक योजनेचे प्रमुख डॉ. ए. एस.टीके तसेच आयडीएफसी फलटण शाखेचे शरद देडे, देवीप्रसाद व धीरज कुमार साळुंखे हे उपस्थित होते.

स्कॉलरशिप मिळालेल्या विद्यार्थिनीच्या कोविड काळातील पालक मृत पावल्याने त्यांना अशा मदतीची गरज होती. या बँकेच्या माध्यमातून ही मदत उपलब्ध झाली. त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कदम यांनी आयडीएफसी बँक व सर्व बँक अधिकारी यांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. एन.के. रासकर व डॉ. टी. पी. शिंदे .प्रा. एम. जे. पाडवी डॉ.एस डी पाटील उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!