दैनिक स्थैर्य | दि. ३० एप्रिल २०२४ | फलटण |
‘बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार’ प्राप्त, श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे श्री जानाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज राजाळे, तालुका फलटण या प्रशालेमधील राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एन.एम.एम.एस.) च्या धर्तीवर राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजनेसाठी सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता नववीमधील सात विद्यार्थ्यांची निवड झाली.
सार्थक धनसिंग जाधव, धनश्री दिनेश निंबाळकर, जानवी मेनीनाथ गवळी, सृष्टी केशव शिंदे, नेहा धनाजी सूर्यवंशी, जान्हवी लालासो जाधव, ज्ञानेश्वरी नितीन शेलार यांना यावर्षीची शिष्यवृत्ती ९६०० रुपये प्रत्येकी मंजूर झाली असून त्यांच्या बँक खात्यावर जमा झाली आहे.
तसेच मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा २०२४ मध्ये इयत्ता सहावीमधील कु. प्रतीक्षा मारूती शेडगे हिने ३०० पैकी २१६ गुण मिळवून तालुकास्तरीय गुणवत्ता यादीत चौदावा क्रमांक संपादन केला. तिचे व एनएमएमएसच्या धर्तीवर सारथी शिष्यवृत्ती योजनेमध्ये शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटणच्या अध्यक्षा श्रीमती सविताकाकी सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), ऑनररी जनरल सेक्रेटरी डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), भैय्यासाहेब तसेच नियामक मंडळाचे सदस्य श्री. महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), प्रशालेच्या प्राचार्या सौ. गायकवाड मॅडम, पर्यवेक्षिका सौ. काकडे मॅडम, मार्गदर्शक शिक्षक श्री. बाचल सर, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.