राजधानीत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि.०३ जानेवारी २०२२ । नवी दिल्ली । स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या महाराष्ट्रातील अग्रणी व भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.

कोपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी  आयुक्त डॉ. निरुपमा डांगे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सावित्रीबाई  फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी  तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माहिती अधिकारी अंजु निमसरकर, उपसंपादक रितेश भुयार  यांच्यासह  उपस्थित कर्मचा-यांनी  प्रतिमेस  पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!