साता-याच्या माध्यमिक शिक्षणाधिका-यांना उपसंचालकपदी बढती


 


स्थैर्य, सातारा, दि.१७ : माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश
क्षीरसागर यांची पुणे येथे अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयात शिक्षण
उपसंचालक पदावर पदोन्नती झाली आहे. याबाबतचे आदेश मंगळवारी सामान्य प्रशासन
विभागाने काढले.

 

श्री. क्षीरसागर यांची राज्य लोकसेवा आयोगामार्फत 2013 मध्ये शिक्षणाधिकारी
म्हणून निवड झाली. त्यानंतर 2013 ते 2017 या कालावधीत राज्य परीक्षा
परिषदेत त्यांनी सहायक आयुक्त म्हणून काम पाहिले. 2017 ते 2018 या काळात
रत्नागिरी जिल्ह्यात माध्यमिक शिक्षणाधिकारी पदावर काम केले.

त्यानंतर एक जून 2018 पासून सातारा जिल्ह्यात माध्यमिक विभागाचे
शिक्षणाधिकारी म्हणून ते पदावर कार्यरत होते. काेराेनाच्या संकट काळात
क्षीरसागर यांनी शैक्षणिक संस्था आणि पालकांमध्ये समन्वय ठेवून कामकाज केले
आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!