US प्रेसिडेंट इलेक्ट बायडेन पुढच्या आठवड्यात जाहिररित्या लस घेणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, दि.१७: जगात कोरोना रुग्णांचा आकडा
7.45 कोटींपेक्षा जास्त झाला आहे. 5 कोटी 23 लाखांपेक्षा जास्त लोक बरे
झाले आहेत. आतापर्यंत 16 लाख 54 हजरांपेक्षा जास्त लोकांनी जीव गमावला आहे.
हे आकडे www.worldometers.info/coronavirus नुसार आहेत.

अमेरिकेत
लसीकरण सुरू झाले आहे. इथल्या काही लोकांना लसी घेण्याची भीती वाटत आहे.
या भीतीवर मात करण्यासाठी, प्रेसिडेंट इलेक्ट जो बिडेन पुढील आठवड्यात लस
घेणार आहेत. जर्मनीमध्ये, संक्रमणामुळे मृत्यूच्या घटना अचानक वाढल्या आहे.

अमेरिका आणि प्रेसिडेंट इलेक्टवर दोन महत्त्वाच्या अपडेट

पहिली
– 20 जानेवारीला होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात पाहुण्याची संख्या खूप कमी
राहिल. सामान्यतः या कार्यक्रमासाठी जवळपास 2 लाख तिकीट विकले जाऊ शकतात.
मात्र यावेळी कोरोनामुळे केवळ एक हजार तिकीट विकले जातील. या व्यतिरिक्त
सीनेट आणि हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव्सचे 535 सदस्य असतील. सविस्तर माहिती
लवकरच दिली जाईल.

दुसरी – प्रेसिडेंट
इलेक्ट जो बायडेन पुढच्या आठवड्यात सार्वजनिकरित्या लसीकरण करुन घेतली.
सध्याचे उपराष्ट्रपती माइक पेंस शुक्रवारी पत्नी कॅरेनबरोबर लसीकरण करणार
आहेत. ‘द गार्डियन’ ने दिलेल्या वृत्तानुसार, बिडेन यांनी स्वतः कबूल केले
की देशातील संसर्गजन्य रोग तज्ञ आणि ट्रम्प यांच्या कोरोना टास्क फोर्सचे
तज्ज्ञ डॉक्टर एंथोनी फौसी यांनी त्यांना लवकरच ही लस घेण्यास सांगितले
आहे.

कोरोना प्रभावित टॉप-10 देशांमध्ये परिस्थिती

देश

संक्रमित मृत्यू बरे झालेले
अमेरिका 17,392,618 314,577 10,170,735
भारत 9,951,072 144,487 9,455,793
ब्राझील 7,042,695 183,822 6,132,683
रशिया 2,734,454 48,564 2,176,100
फ्रान्स 2,409,062 59,361 180,311
तुर्की 1,928,165 17,121 1,691,113
ब्रिटेन 1,888,116 64,908 N/A
इटली 1,870,576 65,857 1,137,416
स्पेन 1,771,488 48,401 N/A
अर्जेंटीना 1,510,203 41,204 1,344,300


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!