दुधेबावीतील भवानी माता मंदिर परिसरास सत्यजितराजेंची भेट

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑक्टोबर २०२२ । फलटण । दुधेबावीचे ग्रामदैवत भवानी माता मंदिर येथे सॅटॅलाइट रोटरी क्लब ऑफ कोरेगाव पार्क पुणेचे अध्यक्ष श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर यांनी आज सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिराचा परिसर फिरून माहिती घेतली. सॅटेलाइट रोटरी क्लब ऑफ कोरेगाव पार्क फलटण यांच्या माध्यमातून मंदिराच्या परिसरात त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

तसेच या ठिकाणी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन त्यांनी मार्गदर्शन केले. बिहार ऑफ पॅटर्न या उपक्रमाच्या माध्यमातून परिसरात चालू असलेले विविध वृक्षांचे संगोपन आणि त्यामधून मंदिराच्या परिसरात वाढत असलेली वृक्षांची संख्या त्याबद्दल त्यांनी या उपक्रमाचे खास कौतुक केले.

या ठिकाणी पाण्याच्या कायम उपलब्धतेबाबत तसेच स्वच्छता राखण्यासाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून उपाय योजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. भविष्यात भवानी माता मंदिर परिसरासाठी गरजेनुसार सहकार्य करण्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. श्रीमंत सत्यजितराजे यांनी भवानी माता देवीची आरती सह दर्शन घेतले.

Back to top button
Don`t copy text!