दैनिक स्थैर्य | दि. २१ मे २०२३ | फलटण |
जिंती (ता. फलटण) येथे मागील झालेल्या भांडणाचा राग मनात धरून सुमारे आठ जणांनी फिर्यादी रवींद्र उर्फ पप्पू दिनकर वाघमारे (वय ३७, रा.जिंती) व मुलगा राजवीर यांना लोखंडी सत्तूर, कुर्हाड व काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बाळू भीमराव रणवरे, शोभा बाळू रणवरे, शरद भीमराव रणवरे, बबल्या शरद रणवरे, विशाल रमेश रणवरे, मुकुंद आण्णासो रनवरे, दत्तात्रय भिमराव रणवरे व अशोक श्रीहरी रणवरे (सर्व रा. जिंती) यांच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दि. १५ मे २०२३ रोजी जिंती गावाजवळ जिंती ते खुंटे रस्त्यावर सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक शौचालयाजवळ वरील सर्व आरोपी यांनी जितोबा मंदिराजवळ यापूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादी पप्पू वाघमारे व त्यांचा मुलगा राजवीर यांना लोखंडी सत्तूर, कुर्हाड, काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले होते. त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर त्यांनी पोलिसात वरील आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणी अधिक तपास सहा. फौजदार यादव करत आहेत.