क्लासला जाणार्‍या विद्यार्थिंनींची छेड काढल्या प्रकरणी दोघा युवकांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २१ मे २०२३ | फलटण |
फलटण शहरातील एसटी स्टॅण्ड ते आयआयटी लक्ष्मीनगर रस्त्यावर क्लासला जाणार्‍या विद्यार्थिनींची छेड काढल्याप्रकरणी दोघा युवकांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आदित्य नारायण पवार व अक्षय पिलाजी आवटे ( दोघेही रा. सुरवडी, ता. फलटण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

शहरातील एसटी स्टॅण्ड ते आयआयटी लक्ष्मीनगर रस्त्यावर दि. १२ मे ते २० मे २०२३ दरम्यान वेळोवेळी फिर्यादी युवती व तिच्या मैत्रीणींची क्लासपर्यंत आदित्य नारायण पवार व अक्षय पिलाजी आवटे हे दोघे युवक स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. एमएच-११-एएच-४१०६)वरून पाठलाग करून हॉर्न वाजवून छेड काढल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली आहे.

या प्रकरणी अधिक तपास शहर पोलीस ठाण्याचे गायकवाड करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!