सातारा जिल्ह्यात पाणीटंचाईचे भीषण संकट; माण, खटाव आणि फलटण तालुक्यांत ३५ टँकर सुरू

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

सातारा जिल्ह्यातील माण, खटाव आणि फलटण तालुक्यांतील ३९ गावे व २३६ वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून प्रशासनाकडून ३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

स्थैर्य, सातारा, दि. ०९ ऑक्टोबर : सातारा जिल्ह्यातील माण, खटाव आणि फलटण या तीन तालुक्यांतील ३९ गावे आणि २३६ वाड्यांमधील ५४ हजार २५७ नागरिक तसेच ४१ हजार १०७ पशुधनाची तहान भागवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये १ शासकीय आणि ३४ खाजगी टँकरचा समावेश असून पाण्याचा तुटवडा दूर करण्यासाठी प्रशासनाने १६ विहिरी आणि ९ बोअरवेल अधिग्रहित केल्या आहेत.

माण तालुक्यात टंचाईची सर्वाधिक झळ

टंचाईचा सर्वाधिक फटका माण तालुक्याला बसला असून ३१ गावे आणि २०० वाड्यांमधील ४५ हजार ७०२ नागरिक बाधित झाले आहेत. तालुक्यातील ३८ हजार ९७२ पशुधनालाही टंचाईचा सामना करावा लागत आहे. तेथे १ शासकीय व २९ खाजगी अशा एकूण ३० टँकरद्वारे पाणी पुरवले जात असून १० विहिरी व ६ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे. दहिवडी, शिंगणापूर, म्हसवड, मार्डी, वरकुटे मलवडी, मलवडी, आंधळी आणि कुकुडवाड परिसरातील गावांना टँकरने पाणी दिले जात आहे.

खटाव आणि फलटणमधील स्थिती

खटाव तालुक्यातील ७ गावे आणि ३६ वाड्यांमधील ७ हजार ८३३ नागरिकांना ४ खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. येथे ६ विहिरी व ३ बोअरवेल अधिग्रहित करण्यात आल्या असून मायणी, का. खटाव, बुध आणि कलेढोण परिसरात पाणीवाटप केले जात आहे. तसेच फलटण तालुक्यातील दुधेबावी मंडळातील एका गावातील ७२२ नागरिकांसाठी १ खाजगी टँकर सुरू करण्यात आला असून प्रशासन टंचाईग्रस्त भागांत दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!