साताऱ्यात भर उन्हाळ्यात पावसाची हजेरी; नागरिकांची उडाली भंभेरी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

सातारा शहरात शुक्रवारी अचानक पावसाचा शिडकाव झाल्याने नागरिकांची भंभेरी उडाली. ऐन उन्हाळ्यात आलेल्या या पावसामुळे सातारकरांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

स्थैर्य, सातारा, दि. २७ मार्च : सातारा शहरात शुक्रवारी दिवसा अचानक पावसाचा शिडकाव झाला. सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू असताना, पूर्वकल्पना नसताना आलेल्या या पावसामुळे नागरिकांची मोठी धांदल उडाली.

वाहनधारक व पादचाऱ्यांची तारांबळ

सध्या साताऱ्यात तापमानाचा पारा वाढलेला आहे. अशातच शुक्रवारी अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या या पावसामुळे रस्त्यावरील पादचारी आणि दुचाकीस्वारांची मोठी तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. अनेकांना आडोसा शोधावा लागला.

नागरिकांमध्ये अवकाळीची चर्चा

ऐन उन्हाळ्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे सातारकरांमध्ये या अवकाळी पावसाचीच चर्चा रंगली होती. हवामानातील या अचानक झालेल्या बदलामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!