सातारा: पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड प्रदान – लोकहित जपण्याचे आवाहन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

सातारा जिल्ह्यातील मितेश खराडे यांच्यासह ग्रामीण पत्रकारांना शासनाचे अधिस्वीकृती कार्ड प्रदान करण्यात आले. हरिश पाटणे यांनी लोकहित जपण्याचे आवाहन केले.

स्थैर्य, सातारा, दि. १७ जून : महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीच्या वतीने सातारा जिल्हा माहिती कार्यालयात मितेश खराडे यांच्यासह ग्रामीण पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड प्रदान करण्यात आले. पत्रकारांनी आपल्या लेखणीतून समाजातील प्रश्नांना वाचा फोडत लोकहित जपावे आणि सत्य पत्रकारितेची परंपरा बळकट करावी, असे आवाहन समितीचे अध्यक्ष हरिश पाटणे यांनी केले.

ग्रामीण पत्रकारांना प्राधान्य

यावेळी हरिश पाटणे म्हणाले की, शासनाच्या अधिस्वीकृती समितीमार्फत सातारा जिल्ह्यातील अनेक पात्र पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका देण्यात आली आहे. हे कार्ड केवळ ओळखपत्र नसून पत्रकाराची समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि जबाबदारीचे प्रतीक आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांना अधिस्वीकृती मिळवून देण्यावर विशेष भर दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मान्यवरांची उपस्थिती

या प्रसंगी पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य चंद्रसेन जाधव, गोरख तावरे, राहुल पवार, सुभाष भांबुरे, रोहित वाकडे, शेखर जगताप आणि अरुण जायकर उपस्थित होते. तसेच अशोक इथापे आणि अरुण जायकर यांनाही यावेळी अधिस्वीकृती पत्रिका देण्यात आली.

Back to top button
Don`t copy text!