
थेट WhatsApp वर मिळवा
दिळी सणासाठी सातारच्या बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची तुफान गर्दी झाली असून मोती चौक व राजपथ विविध रोषणाईने आणि ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेला आहे.
स्थैर्य, सातारा, दि. ०५ नोव्हेंबर : दिवाळीचा सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपल्याने विविध प्रकारच्या खरेदीसाठी सातारकर नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. सणाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील मोती चौक, सदाशिव पेठ आणि राजपथ परिसर ग्राहकांच्या तुफान गर्दीने पूर्णपणे फुलून गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
विविधरंगी रोषणाईने बाजारपेठ सजली
सणानिमित्त कापड दुकाने, आकाशकंदील, पणत्या, पूजा साहित्य आणि गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची मोठी लगबग सुरू आहे. मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी दुकानांवर आकर्षक विद्युत रोषणाई केल्यामुळे संपूर्ण परिसराला एक वेगळीच शोभा आली आहे. रंगीबेरंगी रोषणाईने उजळून निघालेल्या या बाजारपेठेचे विलोभनीय रूप सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.





