फलटणची विश्वांजली चालवणार पुण्याची मेट्रो; ‘लोको पायलट’ म्हणून निवड

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

पुण्याच्या बहुप्रतीक्षित हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे सारथ्य फलटण तालुक्यातील गिरवीची लेक विश्वांजली कदम करणार आहे. या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ०३ नोव्हेंबर : पुण्याच्या बहुप्रतीक्षित हिंजवडी-शिवाजीनगर ‘मेट्रो ३’ चे सारथ्य आता फलटण तालुक्यातील गिरवी येथील विश्वांजली कदम करणार आहे. तिची लोको पायलट म्हणून निवड झाली असून, या यशामुळे गिरवी परिसरासह विरसेन कदम यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

संगणक अभियंता ते लोको पायलट

विश्वांजलीचे दहावीपर्यंतचे शिक्षण फलटणमध्ये झाले. त्यानंतर तिने पुण्यात संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. चाकोरीबाहेरचा नवा मार्ग स्वीकारत तिने मेट्रो लोको पायलट पदाची परीक्षा उत्तीर्ण केली. एक संगणक अभियंता असलेली ग्रामीण भागातील मुलगी आता अत्याधुनिक मेट्रो चालवणार असल्याने हा योगायोग लक्षवेधी ठरला आहे.

महिला सक्षमीकरणाचे उत्तम उदाहरण

‘पिंक लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मार्गावरील सर्व गाड्या सुमारे १०० प्रशिक्षित महिला ऑपरेटर चालवणार आहेत. पीएमआरडीएच्या माध्यमातून उभारलेल्या या मार्गाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. ग्रामीण भागातून पुढे आलेल्या विश्वांजलीच्या या यशामुळे आधुनिक दळणवळण क्षेत्रात महिलांचा आत्मविश्वास वाढला असून, परिसरातील मुलींसाठी हा प्रवास प्रेरणादायी ठरणार आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!