वारकर्यांना सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध : पोलीस अधीक्षक तुषार दोशी


दैनिक स्थैर्य । दि. 04 जुन 2025 । फलटण । श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा सातारा जिल्ह्यातून पुढे पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतो; या पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी प्रतिवर्षीपेक्षा जास्त काटेकोरपणे नियोजन करण्याचे आमचा मानस असल्याचे मत सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांनी व्यक्त केले आहे.

फलटण येथील पालखीतळाची पाहणी करताना जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, उपविभागीय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल मोरे, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, सुनील महाडिक यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना तुषार दोशी म्हणाले की, यंदाच्या वर्षी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे नियोजन हे काटेकोरपणे करत असून प्रतिवर्षीपेक्षा उत्तम नियोजन करण्याचा आमचा मानस आहे.

यावेळी फलटण पालखी तळाबाबतची सविस्तर माहिती फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल मोरे व तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांना दिली.


Back to top button
Don`t copy text!