सासकल: जि. प. शाळेत प्रवेशोत्सव – विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

सासकल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नव्या शैक्षणिक वर्षाचा प्रवेशोत्सव उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

स्थैर्य, सासकल, दि. 16 जून : सासकल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रवेशोत्सव, नवागतांचे स्वागत तसेच पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप सोहळा 15 जून रोजी पार पडला. शैक्षणिक गुढी उभारून आणि बैलगाडीतून मिरवणूक काढून नव्या विद्यार्थ्यांचे शाळेत उत्साहात स्वागत करण्यात आले.

विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक

पहिलीत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची गावातून बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. स्वप्नपूर्तीचे पहिले पाऊल म्हणून या विद्यार्थ्यांच्या पायांचे ठसे उमटवून त्यांचा शाळा प्रवेश करण्यात आला. या नाविन्यपूर्ण स्वागतामुळे मुले आणि पालकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

शालेय साहित्याचे वाटप

स्वरा स्टील फर्निचर उद्योग समूहाचे लहूराजे सावंत यांच्या पुढाकाराने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि पाण्याच्या बॉटलचे वाटप करण्यात आले. यासोबतच प्रशासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेश देण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती

या उपक्रमासाठी लहूराजे सावंत, सरपंच सोनाली मदने आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश मुळीक प्रमुख उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत सदस्य हनुमंत मुळीक, सोपान मुळीक, शंकर मुळीक, मोहन मुळीक, मुख्याध्यापक अरुण कांबळे, शिक्षिका सुकीर्ती निकाळजे आणि संध्याकाळी जगदाळे यांच्यासह गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!