सासकलमध्ये २५ घरकुलांना मंजुरी; हक्काच्या घराचे स्वप्न अखेर साकार

फलटण तालुक्यातील सासकल गावात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तब्बल २५ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे गरजूंचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार असून ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

स्थैर्य, सासकल, दि. ११ ऑगस्ट : फलटण तालुक्यातील सासकल गावामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत तब्बल २५ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे गावातील गरजू आणि गरीब कुटुंबांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होणार आहे.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून या घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल सासकलमधील ग्रामस्थांच्या वतीने या सर्व नेत्यांचे विशेष आभार मानण्यात आले आहेत.

स्थानिक पातळीवर सातत्यपूर्ण पाठपुरावा

गावातील गरजूंना हक्काचे घर मिळावे यासाठी स्थानिक पातळीवर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. यामध्ये सासकलचे युवा नेते दिनेश मुळीक, माजी सरपंच हनुमंत मुळीक, विनायक मदने आणि मंगेश मदने यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याची माहिती दिनेश मुळीक यांनी दिली.

Back to top button
Don`t copy text!