
दैनिक स्थैर्य । दि. १५ ऑगस्ट २०२२ । फलटण । सध्या संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील सरडे येथील नवनियुक्त सरपंच सौ. प्रियांका नवनाथ धायगुडे यांच्या मार्फत सरडे गावामधील निराधार महिलांना मोफत साड्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन विविध ठिकाणी करण्यात आलेले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त फलटण तालुक्यातील सरडे येथील नवनियुक्त सरपंच सौ. प्रियंका नवनाथ धायगुडे यांनी सरडे गावांमधील निराधार महिलांना मोफत साडी वाटपाचा कार्यक्रम हाती घेतलेला होता. हा कार्यक्रम दि. 15 ऑगस्ट २०२२ रोजी संपन्न झाला.
यावेळी बोलताना सरपंच सौ. प्रियंका धायगुडे म्हणाल्या की, सरडे गावामधील जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. आपल्या सरपंच पदाच्या कार्यकाळामध्ये विविध उपक्रम राबवून सरडे गावचे नाव राज्याच्या नकाशावर घेण्याचा आपला प्रयत्न असणार आहे.