
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, फलटण, दि. ३१ : बुवासाहेबनगर कोळकी ता.फलटण येथील रहिवासी कै. संतोष वनाजी सावंत यांचे अल्पशा आजाराने सातारा येथे खाजगी रुग्णालयात निधन झाले ते श्रीराम सहकारी साखर कारखाना कामगारांची पतपेढी येथे ते नोकरीस होते. पञकार यशवंत खलाटे पाटील यांचे ते सासरे होते. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असुन त्यांच्या अचानक जाण्याने सर्वञ हळहळ व्यक्त केली जात आहे..त्यांच्या पश्चात पत्नी,२ मुले,१ मुलगी,सुन नातवंडे असा परिवार आहे.
