दुधेबावी प्रतिष्ठानतर्फे आजपासून संत गाडगेबाबा व्याख्यानमालेचे आयोजन


दैनिक स्थैर्य | दि. ७ जून २०२४ | फलटण |
दुधेबावी, ता. फलटण येथील दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवार, दि. ७ जून ते मंगळवार, दि. ११ जून दरम्यान रोज सायंकाळी ७ वाजता संत गाडगेबाबा व्याख्यानमालेचे आयोजन केले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर, व्याख्यानमाला कमिटीचे अध्यक्ष डॉ. सागर कराडे यांनी दिली. प्रतिष्ठानतर्फे सलग २४ व्या वर्षी या व्याख्यानमालेचे आयोजन होत आहे.

व्याख्यानमालेचे उद्घाटन शुक्रवार, दि. ७ जून रोजी सायंकाळी ७ वाजता सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारच्या अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल या असून विशेष अतिथी म्हणून मुंबईचे अतिरिक्त आयकर आयुक्त तुषार मोहिते, क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारचे डॉ. युवराज करपे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे नेते उदयराव शिंदे, अखिल भारतीय शिक्षक महासंघाचे कोषाध्यक्ष सिद्धेश्वर पुस्तके, सातारा जिल्हा शिक्षक संघाचे नेते बलवंत पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, शिक्षक बँकेचे चेअरमन किरण यादव, ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, माजी अधीक्षक अभियंता दिनकरराव सोनवलकर, माजी पंचायत समिती सदस्य सुभाषराव सोनवलकर, पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर, सरपंच भावनाताई सोनवलकर, उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे उपस्थित राहणार आहेत.

शुक्रवार दि. ७ जून रोजी प्रा. रवींद्र कोकरे यांचे ‘संस्काराची शिदोरी’ या विषयावर व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून फलटण तालुका मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष प्रा. रमेश आढाव, विठ्ठलवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक बोराटे उपस्थित राहणार आहेत.

शनिवार, दि. ८ जून रोजी विवेकानंद पाटील माजगावकर यांचे ‘तरुणांनो तारुण्य समजून घ्या’ या विषयावर व्याख्यान होणार असून जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती प्रभावती कोळेकर अध्यक्षस्थानी असून प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार सुभाष भांबुरे, उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यावेळी उपस्थित राहणार आहेत.

रविवार, दि. ९ जून रोजी प्रसिद्ध वक्ते प्रा. वसंतराव हंकारे यांचे ‘बाप समजावून घेताना’ या विषयावर व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार किरण बोळे, मीरा भाईंदरचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सोनवलकर उपस्थित राहणार आहेत.

सोमवार, दि. १० जून रोजी अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते समृद्धी जाधव यांचे ‘पोटचा मोड वाया जाऊ नये म्हणून’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले असून प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार यशवंत खलाटे पाटील, मुंबईचे पोलीस उपनिरीक्षक सागर नाळे उपस्थित राहणार आहेत.

मंगळवार, दिनांक ११ जून रोजी ‘चांडाळ चौकडीच्या करामती’ फेम, भुंडीस चित्रपट फेम अभिनेते रामभाऊ जगताप यांचे ‘जिथे विषय गंभीर…’ या विषयावर व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी फलटणचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे असून प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार विकास शिंदे, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय दडस उपस्थित राहणार आहेत.

या ज्ञानश्रृंखलेचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विजयकुमार नाळे, कार्याध्यक्ष संतोष भांड, खजिनदार डॉ. युवराज एकळ, व्याख्यानमाला कमिटीचे अध्यक्ष डॉ. सागर कराडे, सांस्कृतिक कमिटीचे अध्यक्ष सचिन सोनवलकर यांच्यासह प्रतिष्ठानच्या सदस्यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!