“संजय राऊतांनी पत्राचाळमध्ये भ्रष्टाचार करण्यासाठी, मराठी माणसाला लुटण्यासाठी घाम गाळला” – चित्रा वाघ


दैनिक स्थैर्य । दि. १० मे २०२३ । मुंबई । ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी घाम आणि पैसा गाळून देखील भाजपाचा दारुण पराभव होत आहे. हा 2024साठी शुभ शकुन आहे. दुःख इतकेच की महाराष्ट्राचे सध्याचे मिंधे राज्यकर्ते यांनी आपल्या सीमा भागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवासाठी कारस्थाने केली. स्वतःला शिवसेना म्हवणून घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी मंगलोरमार्गे काही खोके बेळगावात पाठवून एकीकरण समितीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी शर्थ केली” असा गंभीर आरोप केला आहे.

भाजपाने यानंतर संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “सर्वज्ञानी संजय राऊतांनी घाम गाळला पत्राचाळमध्ये भ्रष्टाचार करण्यासाठी, मराठी माणसाला लुटण्यासाठी, बेकायदा जमिनी खरेदी करण्यासाठी, कोविडमध्ये कंत्राटं घेऊन कमावण्यासाठी” असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

“मोदीजी गरीबांचं कल्याण करण्याबरोबरच देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी घाम गाळताहेत. तुमची लायकी पण नाही त्यांच्यावर बोलायची. बाकी टिका करणारे  “भौंकते रहते है और हाथी चलता है !”” असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. संजय राऊत यांनी ट्विट करुन केंद्रातील मोदी-शहांच्या नेतृत्त्वावर आणि राज्यातील मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला आहे. तसेच, महाराष्ट्राशी ही गद्दारीच आहे.. मराठी माणूस हे लक्ष्यात ठेवील, असेही राऊत यांनी म्हटलं.

Back to top button
Don`t copy text!