कोकण विभागीय माहिती कार्यालयाचे संजय कोळी यांचे दीर्घ आजाराने निधन


दैनिक स्थैर्य । दि. २९ मार्च २०२३ । मुंबई । कोकण विभागीय माहिती कार्यालयातील अंधार कोठडी सहायक म्हणून  कार्यरत असलेले श्री. संजय नवल कोळी, वय 52 वर्षे यांचे दीर्घ आजाराने आज सकाळी दु:खद निधन झाले.

श्री. कोळी यांच्यावर त्यांचे मूळ गाव चोपडा जि.जळगाव या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्री. संजय नवल कोळी हे जून 1995 पासून 28 वर्षे शासकीय सेवेत कार्यरत होते.  ते आजारी असल्याने काही महिन्यांपासून त्यांच्यावर एमजीएम हॉस्पीटल नवी मुंबई आणि जे.जे.रुग्णालय मुंबई येथे उपचार सुरु होते. आज सकाळी त्यांचे दु:खद निधन झाले. यावेळी  त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक तसेच विविध क्षेत्रातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. कोकण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनीही त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.


Don`t copy text!