दैनिक स्थैर्य | दि. १ सप्टेंबर २०२३ | फलटण |
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत राहून समाजातील तसेच महिलांवरील अन्यायास वृत्तपत्रातून वाचा फोडून पत्रकार बंधू एक महान सामाजिक कार्य करीत आहेत, असे प्रतिपादन फलटण येथील संगिनी फोरमच्या अध्यक्षा अपर्णा जैन यांनी केले.
रक्षाबंधनानिमित्त संगीनी फोरम, फलटणतर्फे पत्रकार बंधूंना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. यावेळी पत्रकार बंधूंना राखी बांधून त्यांचे औक्षण करण्यात आले. तसेच मिठाई व अल्पोपहार देण्यात आला.
यावेळी पत्रकारांनी संगीनी फोरमच्या उपक्रमाबद्दल धन्यवाद व्यत केले. यावेळी संगिनी सदस्या व पदाधिकारी उपस्थित होते.