विकासकामांच्या जोरावर खासदार रणजितसिंह यांना निवडून देणे गरजेचे : समशेरसिंह


दैनिक स्थैर्य | दि. 08 एप्रिल 2024 | फलटण | खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कोविड 19 चा काळ सोडला तर गेल्या अडीच वर्षांमध्ये जे काम माढा मतदार संघात केले आहे. ते काम एवढे मोठे आहे, की देशातल्या पहिल्या दहा खासदारांच्या यादीत त्यांच्या कामाचा लेखाजोखा मांडला जातो तसेच फलटणकरांना आपली कामे व्हावीत, फलटणचा विकास व्हावा असं वाटत असेल तर फलटणचा खासदार असलाच पाहिजे असे मत समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी अध्यक्षस्थानी बोलताना व्यक्त केले.

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका हा राजकीय दृष्ट्या संवेदनशील तालुका म्हणून ओळखला जातो. तसेच सातारा जिल्ह्यातील फलटण व माण हे दोन तालुके माढा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट करण्यात आलेले आहेत. या मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ फलटण शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अनुप शहा यांच्याकडून फलटण नगर परिषदेचे विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आजी – माजी नगरसेवक विविध आघाड्या मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मागील निवडणुकीमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना फलटण शहरातून मताधिक्य मिळाले परंतु आज ज्या पद्धतीने खासदारांनी फलटण शहरांमध्ये विकास कामे केली आहेत. ह्याच विकास कामांच्या जोरावर मी हे सांगू शकतो की फलटणकर शहरातून खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना मोठे मताधिक्य देतील असा विश्वास फलटण शहर भाजपचे अध्यक्ष अनुप शहा यांनी व्यक्त केले.

या बैठकी करिता फलटण नगरपालिकेचे माजी नगरसेवक अशोकराव जाधव, बाळासाहेब कुंभार, डॉ. प्रवीण आगवणे, नंदकुमार घाडगे, सचिन अहिवळे, फलटण तालुका विधानसभा प्रभारी सचिन कांबळे – पाटील, फलटण तालुका पश्चिम मंडल अध्यक्ष अमोल सस्ते, उपाध्यक्ष सागर लंबाते, वैद्यकीय आघाडीचे डॉ. अनिल श्रीवास्तव, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे तालुकाध्यक्ष रियाज इनामदार, व्यापारी आघाडीचे वसीम मनेर, भाजप कार्यकर्ते राजेश हेंद्रे, तुकाराम शिंदे, राजेंद्र काळे, राहुल पवार, संजय गायकवाड, मंगेश आवळे, सतीश जंगम, सागर शहा, तानाजी करळे, निखिल उपाध्ये, निलेश चिंचकर, आबा बेंद्रे राजकुमार देशमाने, यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीपकुमार जाधव व आभार प्रदर्शन निलेश खानविलकर यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!