
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २२ ऑगस्ट २०२६ | लोणंद |
सालपे (ता. फलटण) गावच्या हद्दीत लोणंद-सातारा रस्त्यावर डांबरीकरण करण्यासाठी वापरण्यात येणार्या ब्राउझर वाहनाला दुचाकीने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात ज्ञानेश्वर हनुमंत मदने (वय ६०, रा. सालपे, ता. फलटण) यांचा मृत्यू झाला. याबाबत आनंदा तात्याबा मदने (वय ४७, रा. सालपे) यांनी फिर्याद दिली.
मदने हे दुचाकीवरून शेतातून घरी जात होते. त्यावेळी लोणंदकडून सातार्याच्या दिशेने जाणार्या रस्त्यावर डांबरीकरणाचे काम सुरू असताना ब्राउझरला त्यांच्या दुचाकीने पाठीमागून धडक दिली. या अपघातात ज्ञानेश्वर मदने गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.