LPG e-KYC ची २३ ऑगस्ट शेवटची मुदत; अन्यथा गॅस सिलिंडरचा पुरवठा होणार बंद

भारतगॅस ग्राहकांसाठी e-KYC पूर्ण करण्याची अंतिम मुदत २३ ऑगस्ट आहे. मुदतीत e-KYC न केल्यास गॅस सिलिंडर पुरवठा बंद होईल, अशी माहिती फलटणच्या विक्रम एजन्सीने दिली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २२ ऑगस्ट : भारतगॅसच्या ग्राहकांना e-KYC पूर्ण करण्यासाठी २३ ऑगस्ट ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत e-KYC पूर्ण न केल्यास ग्राहकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा करता येणार नाही, अशी महत्त्वाची सूचना फलटण येथील विक्रम एजन्सीच्या वतीने देण्यात आली आहे.

फक्त दोन मिनिटांत होईल e-KYC

भारतगॅसने सर्व ग्राहकांसाठी e-KYC सक्तीची केली आहे. ज्या ग्राहकांनी अद्याप आपली e-KYC पूर्ण केलेली नाही, त्यांनी तात्काळ विक्रम एजन्सी, फलटण येथे जाऊन ती पूर्ण करावी. ही प्रक्रिया अत्यंत सोपी असून ती अवघ्या दोन मिनिटांत पूर्ण होते, असे एजन्सीच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांनी कोणत्याही विलंबाविना आपली नोंदणी अद्ययावत करून घ्यावी.

नाव बदलण्यासाठी ‘चेंज फॉर्म’

ज्या ग्राहकांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे आणि त्यांचे निधन झाले असेल, अशा प्रकरणांमध्ये गॅस कनेक्शन दुसऱ्याच्या नावावर करण्यासाठी वारसांनी ‘चेंज फॉर्म’ भरणे आवश्यक आहे. संबंधितांनी विक्रम एजन्सीमध्ये या फॉर्मसाठी अर्ज करावा. २३ तारखेनंतर e-KYC न झालेल्या ग्राहकांना गॅस सिलिंडर मिळणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन विक्रम एजन्सीने केले आहे.

Back to top button
Don`t copy text!