आढाववस्तीत समता सैनिक दलाचे शिबिर; २२ सैनिकांना सैनिकी व शिस्तीचे प्रशिक्षण

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आढाववस्ती येथे BSI मिशन २५ अंतर्गत २२ सैनिकांना सैनिकी व शिस्तीचे प्रशिक्षण देण्यात आले.

स्थैर्य, फलटण, दि. १८ ऑक्टोबर : भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा शाखा (पूर्व) च्या वतीने BSI मिशन २५ अंतर्गत समता सैनिक दलाचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर आढाववस्ती (गुणवरे), तालुका फलटण येथे पार पडले. या शिबिरामध्ये केंद्रीय शिक्षक संपत भोसले आणि कंपनी कमांडर अर्चना चव्हाण यांनी सैनिकांना सैनिकी शिस्त, संचलन आणि परेडचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले.

सैनिकी शिस्त व प्रात्यक्षिकांवर भर

समता सैनिक दलाच्या शताब्दी वर्ष २०२७ पर्यंत प्रत्येक तालुका व शहरात २,००० प्रशिक्षित सैनिक तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या मोहिमेचा भाग म्हणून आयोजित या शिबिरात सहभागी सैनिकांना परेडचे नियम, लाईन तोड पद्धत, ड्रिल, सलामी, संचलन, रांगेतील शिस्त आणि ध्वजवंदन या बाबींचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. शारीरिक कवायतींसोबतच वेळेचे भान, नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व यावेळी स्पष्ट करण्यात आले.

२२ सैनिकांचे प्रशिक्षण पूर्ण

डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर व ॲड. एस. के. भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिरात फलटण तालुक्यातील १९ आणि बारामती तालुक्यातील ४ अशा एकूण २२ सैनिकांनी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. यामध्ये शुभम अहिवळे, विश्वभूषण आढाव, सिद्धार्थ आढाव, बुद्धभूषण आढाव, अरविंद आढाव, बबन आढाव, तानाजी सावंत, प्राशु कांबळे, वैशाली कांबळे यांच्यासह इतर शिबिरार्थींचा समावेश होता. या उपक्रमामुळे आढाववस्ती परिसरात संघटनेची बांधणी मजबूत होण्यास मदत झाली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!