साखरवाडी विद्यालयाचा ५ जानेवारीला वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. २९ डिसेंबर २०२३ | फलटण |
साखरवाडी शिक्षण संस्थेच्या साखरवाडी विद्यालय, साखरवाडी या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार, दि. ५ जानेवारी २०२४ रोजी साखरवाडी विद्यालयात संपन्न होत आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षिका सौ. श्रध्दा वाळिंबे, माजी विद्यार्थी व समाज कल्याण आयुत सातारा श्री. नितीन उबाळे, कृषी उपसंचालिका सांगली प्रियांका भोसले, माजी विद्यार्थी संदीप भोंडे असणार आहेत.

अध्यक्षस्थान साखरवाडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धनंजय साळुंखे पाटील, विश्वस्त समिती अध्यक्ष प्रल्हादराव साळुंखे पाटील, साखरवाडी शिक्षण संस्थेचे संचालक श्री. विक्रम आपटे, श्री. राजेंद्र भोसले, श्री. राजेंद्र शेवाळे, श्री. कौशल भोसले हे भूषविणार आहेत.

यावेळी शालांत परीक्षेतील, विविध स्पर्धांतील तसेच शिष्यवृत्तीधारक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

यावेळी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्राथमिकचे मुख्याध्यापक संदीप चांगण, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका सौ. उर्मिला जगदाळे यांनी केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!