
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ८ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
महाराष्ट्र शासनाचा कृषी सेवारत्न पुरस्कार सासकल (ता. फलटण) चे कृषी सहाय्यक सचिन जाधव यांना मिळाल्याबद्दल सातारा जिल्ह्यातील पहिले ‘कृषी सेवक रत्न’ प्राप्त करण्याचा मान त्यांना मिळालेला आहे.
या पुरस्काराबद्दल फलटण कृषि विभागामार्फत तालुका कृषि अधिकारी फलटण दत्तात्रय गायकवाड यांच्या हस्ते जाधव यांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी सर्व मंडल कृषि अधिकारी, कृषी पर्यवेक्षक संघटना, कृषि सहायक संघटना फलटण यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
