दैनिक स्थैर्य | दि. 13 जून 2023 | फलटण | फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांची सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात भूसंपादन उपजिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली असून फलटणच्या उपविभागीय अधिकारी पदी सचिन ढोले यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याबाबतचा शासन आदेश नुकताच पारित झालेला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही महिन्यांपासून फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांची बदली प्रलंबित होती. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना प्रतीक्षेत थांबावे लागलेले होते. परंतु आता ही बदली झाली असून त्यांच्या जागी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त सचिन ढोले यांची बदली करण्यात आलेली आहे. तर शिवाजीराव जगताप हे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात भूसंपादन उपजिल्हाधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहे. याबाबतचा शासन आदेश काल रात्री उशिरा जारी करण्यात आलेला आहे.