
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, फलटण दि. 19 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) फलटण आगारातून शेतकरी, व्यापारी व कारखानदारांच्या मालाची वाहतूक महाराष्ट्रात कोठेही माफक दरात करण्यात येणार असून त्यासाठी फलटण आगारात खास माल वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेले एस. टी. चे ट्रक उपलब्ध झाल्याची माहिती प्रभारी आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांनी दिली आहे.
कमाल ९ टनापर्यंत सदर वाहतूक सुविधा उपलब्ध असून प्रति कि.मी.३५ रुपये आणि किमान आकार ३ हजार रुपयांपर्यंत भाडे आकारणी करण्यात येणार असल्याचे प्रभारी आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी सहाय्यक वाहतूक निरीक्षक धीरज अहिवळे 7757886786, स्थानक प्रमुख राजेंद्र वाडेकर 7821947352, वाहतूक निरीक्षक दत्तात्रय महानवर 9822648449 या क्रमांकावर संपर्काचे आवाहन करण्यात आले आहे.
