आशियाई स्पर्धेत भारताला सुवर्ण; कोळकीच्या ऋतुजा पिसाळचे आमदार सचिन पाटलांकडून कौतुक

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

एशियन गेम्स २०२६ मध्ये तब्बल ४४ वर्षांनंतर भारताला हॉकीत सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या कोळकीच्या ऋतुजा पिसाळचे आमदार सचिन पाटील यांनी घरी जाऊन अभिनंदन केले.

स्थैर्य, कोळकी, दि. १२ ऑक्टोबर : एशियन गेम्स २०२६ च्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत तब्बल ४४ वर्षांनंतर भारताला हॉकीमध्ये सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या कोळकी (ता. फलटण) येथील ऋतुजा पिसाळ हिचे आमदार सचिन पाटील यांनी घरी जाऊन अभिनंदन केले.

सुवर्णपदकाचा ऐतिहासिक आनंद

जागतिक स्तरावर फलटण तालुक्याचे नाव उंचावणाऱ्या ऋतुजा दादासो पिसाळ हिने एशियन गेम्समध्ये दमदार खेळ करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. या ऐतिहासिक यशानंतर संपूर्ण तालुक्यातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार सचिन पाटील यांनी कोळकी येथील तिच्या निवासस्थानी भेट देऊन तिचे विशेष कौतुक केले.

मान्यवरांची उपस्थिती आणि शुभेच्छा

आमदार सचिन पाटील यांनी ऋतुजाला तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल सन्मानित केले आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत पंचायत समिती सदस्य विकास नाळे, माजी सदस्य सचिन रणवरे, संजय देशमुख आणि पत्रकार किरण बोळे यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!