दैनिक स्थैर्य । दि.०८ फेब्रुवारी २०२२ । सातारा । अत्यंत संयमी आणि तरुण तडफदार दैनिक सकाळचे प्रतिनिधी रूपेश कदम यांची दहिवडी शहर पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल रूपेश कदम यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी सत्कार करताना शिक्षक बँकेचे व्हाईस चेअरमन महेंद्र अवघडे, भारतीय जैन संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भरतेशशेठ गांधी, संघाचे संपर्क प्रमुख हरीश गोरे, माण तालुका दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष किशोर देवकर, राहुल भोसरकर, नाडेकर गुरुजी यावेळी उपस्थित होते.