धावपटू अनुष्काला रयत शिक्षण संस्थेतर्फे दोन लाखांचा धनादेश


दैनिक स्थैर्य । 19 मे 2025। सातारा। आंतरराष्ट्रीय धावपटू अनुष्का कुंभार हिचा रयत शिक्षण संस्थेतर्फे दोन लाख रुपयांचा धनादेश देऊन अनोखा गौरव करण्यात आला. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा धनादेश प्रदान करण्यात आला. या वेळी रयत शिक्षण संस्थेचे संस्थेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख, संघटक डॉ. अनिल पाटील, सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे आदी उपस्थित होते.

अनुष्का ही सध्यातिरुअनंतपुरम (केरळ) येथे आयोजित भारतीय महिला संघाच्या सराव शिबिरात सहभागी झाली आहे. त्यामुळे तिचे वडील दत्तात्रय कुंभार अन् आई स्वाती यांनी हा धनादेश स्वीकारला. अनुष्का ही सातारा तालुक्यातील वर्णे गावची रहिवासी आहे. देशातील अव्वल दर्जाची धावपटू म्हणून ती ओळखली जाते. सध्या ती सातार्‍यातील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात पदवीच्यातिसर्‍या वर्गात शिकत आहेत. प्रशिक्षक बळवंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली तिचा कसून सराव सुरू आहे. वर्णेच्या जिल्हा परिषद शाळेतशिकत असल्यापासूनच अनुष्काने धावण्यात ठसा उमटविला. फारशा सोयीसुविधा नसतानाही तिने आपल्या सरावात कधीच खंड पडू दिला नाही.

अनुष्का आतापर्यंत कोलंबिया, कुवेत, दुबई, पेरू आदी देशांत झालेल्या मैदानी स्पर्धांत सहभागी झाली आहे. आरंभीच्या काळात तिने पुणे, गुवाहाटी, भोपाळ, चेन्नई, छत्तीसगड, नदीयाल येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांतूनही पदकांची कमाई केली. अंगापूर रस्ता असो, या ठिकाणचा तिचा सराव कधीही चुकत नसे. तिचे वडील दत्तात्रय कुंभार यांची जिद्दही याकामी महत्त्वपूर्ण ठरली. वर्णेतून ते रोज सरावासाठी तिला दुचाकीवरून तिला सातार्‍याला ने-करत.


Back to top button
Don`t copy text!