रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक आणि सॅम्युअल मिरांडाला अटक


 

स्थैर्य, मुंबई, दि. 4 : आज पहाटेपासूनच नार्कोटिक्स ब्युरो पथकाने सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात धाडसत्र सुरू केले आहे. सकाळीच एनसीबीची दोन पथके रिया चक्रवर्तीच्या घरी दाखल झाली होती तर सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा याच्याही घरी एनसीबीचे एक पथक तपासासाठी दाखल झाले होते. तब्बल तीन ते चार तासांच्या चौकशीनंतर आता एनसीबीने रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा याला ताब्यात घेतले आहे.

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर संपूर्ण बॉलिवूड विश्‍व ढवळून निघाले आहे. अशातच या प्रकरणात तपास करणार्‍या नार्कोटिक्स ब्युरोने ड्रग्ज कनेक्शनमध्ये तपास सुरू केला आहे. आज सकाळीच सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी आणि सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या घरी एनसीबीची दोन पथके दाखल झाली आहे तसेच सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा याच्याही घरी एनसीबीचे एक पथक तपासासाठी गेले होते. दरम्यान, या प्रकरणात रिया चक्रवर्तीला अटक होणार अशा चर्चा रंगल्या होत्या. परंतु, आता एनसीबीने या प्रकरणी मोठी कारवाई करत, रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा याला ताब्यात घेतले आहे.

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील ड्रग अँगल समोर आल्यानंतर एनसीबीकडून वेगाने तपास सुरू आहे. एनसीबीच्या तपासादरम्यान सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांचे ड्रग्ज तस्करांशी संबंध असल्याचे समोर आले. या प्रकरणाशी संबंधित अनेक ड्रग्ज तस्करांना अटकही करण्यात आली. या दरम्यान अधिक तपास करण्यासाठी एनसीबीचे एक पथक आज सकाळीच रिया चक्रवर्तीच्या घरी दाखल झाले होते.

रिया- शौविकचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट

रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती या दोघांमधील व्हॉट्सअ‍ॅप चॅट समोर आले आहे. या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून खुलासा झाला आह, की रिया आपला भाऊ शौविककडे ड्रग्जची मागणी करत होती. रिया यामध्ये एका तिसर्‍या व्यक्तीचाही उल्लेख करत आहे. रिया म्हणत आहे, की तो दिवसातून चार वेळा पितो, त्या अंदाजाने प्लान कर. त्यानंतर शौविक तिला म्हणतो, की ‘आणि बड्स, त्याला पाहिजे?’ रिया म्हणते, ‘हो बडसुद्धा.’ शौविक म्हणतो, की ‘मी 5 ग्राम बडची व्यवस्था करू शकतो, यापासून 20 सिगरेट तयार होतात.’

दरम्यान, एनसीबीने आतापर्यंत चार अंमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक याचे अंमली पदार्थ तस्कर, विक्रेत्यांसोबत संबंध स्पष्ट झाल्याचा दावा एनसीबीने केला आहे. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार बॉलिवूड तसेच मुंबईतील उच्चभ्रू ग्राहकांना गांजा विकणार्‍या अब्बास लखानी, करण अरोरा, झैद विलात्रा आणि बसीत परिहार या चार तरुणांना अटक करण्यात आली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!