राज्यातील सलून व्यवसाय पुन्हा सुरू करा; महाराष्ट्र नाभिक महामंडळाची मागणी


स्थैर्य, फलटण, दि. ११: सध्या सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू केलेले आहेत. त्या मुळे नाभिक समाजातील बहुतांश व्यावसायिकांचे हाल होत आहेत. मागील वर्षी कोरोनामुळे जवळपास संपूर्ण वर्षभर व्यवसाय करता आलेला नाही. त्याचेच चटके अजूनही नाभिक बांधव सोसत आहेत. तरी आता कडक निर्बंधामधून सलून व्यावसायिकांना सवलत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने करण्यात आलेली आहे.

सलून व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी या बाबतचे सविस्तर निवेदन माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांना महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने देण्यात आले.

या वेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे महाराष्ट्र नाभिक महामंडळ राज्याचे ज्येष्ठ सल्लागार बापूसाहेब काशीद, विठ्ठल महाराज गायकवाड, राज्य सदस्य तसेच सातारा जिल्हा महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा कार्याध्यक्ष अंबादास दळवी, आनंदराव राऊत, फलटण शहराध्यक्ष जयदीप राऊत, फलटण शहर उपाध्यक्ष शेखर करवे, अक्षय देवकर, फलटण शहर खजिनदार पोपटराव काशीद, जनार्दन मोरे, मयूर उल्हाळकर, सागर राऊत, न्यानेश्वर कर्वे, विकासराव कर्वे, महेश कर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!