नगरपरिषद, नगरपंचायत नगराध्यक्ष आरक्षण सोडत ६ ऑक्टोबरला मुंबईत

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण, दि. ३ ऑक्टोबर : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत सोमवार, दि. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईत काढली जाणार आहे. राज्याच्या नगर विकास विभागाने सर्व राजकीय पक्षांना पत्र पाठवून या सोडतीची माहिती दिली आहे.

नगर विकास विभागाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी यांनी काढलेल्या पत्रानुसार, राज्यातील २४७ नगरपरिषदा व १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी ही सोडत प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही सोडत मुंबईतील मंत्रालय येथील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेच्या कारणास्तव प्रत्येक राजकीय पक्षाला दोन प्रतिनिधींना या सोडतीसाठी पाठवण्याची विनंती शासनाने केली आहे. या सोडतीमध्ये फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होणार, हे निश्चित होणार असल्याने तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष या सोडतीकडे लागले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!