अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणासाठी फलटणमध्ये ‘सामाजिक न्याय परिषद’; महत्त्वाचा निर्णय होणार?

अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर फलटणमध्ये आरक्षण वर्गीकरण सामाजिक न्याय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ०३ सप्टेंबर : सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यास घटनात्मक मान्यता दिल्यानंतर महाराष्ट्रात याची अंमलबजावणी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर फलटण येथे ‘आरक्षण वर्गीकरण सामाजिक न्याय परिषद’ आयोजित करण्यात आली आहे.

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त परिषदेचे आयोजन

डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता फलटण एसटी स्टँडजवळ, रिंग रोड येथील रॉयल क्राउनच्या बँक्वेट हॉलमध्ये पार पडणार आहे.

प्रमुख उपस्थिती आणि बैठकीचे उद्दिष्ट

या परिषदेच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे राहणार असून, प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. परिषदेमध्ये आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची अंमलबजावणी आणि सामाजिक न्यायाशी संबंधित विविध मागण्यांवर सखोल चर्चा होणार आहे. या परिषदेस नागरिक व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Back to top button
Don`t copy text!