
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ३० ऑक्टोबर २०२३ | फलटण |
बरड (ता. फलटण) गावच्या हद्दीत काल सायंकाळी ७.०० वाजता जर्शी गाईची चार वासरे कत्तलीसाठी बेकायदेशीररीत्या दाटीवाटीने छोटा हत्ती टेम्पो (क्र. एमएच ११-बीएल-६७३५) मध्ये कोंबून, चारापाण्याची व्यवस्था न करता घेऊन जात असताना पोलिसांनी पकडून त्या वासरांची सुटका केली. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल तानाजी बबन ढोले यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी टेम्पोचालक महादेव नारायण पवार (वय ५७, रा. राजुरी, ता. फलटण) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी अधिक तपास पो. हवा. चांगण करत आहेत.
