दैनिक स्थैर्य | दि. ६ मे २०२३ | फलटण |
कुरेशीनगर (ता. फलटण) येथील नगरपालिकेच्या उर्दू शाऴेजवळ पोलिसांनी एक आयशर कंपनीचा टेम्पो पकडून सुमारे २२ गोवंशीय वासरांची सुटका केली. यावेळी पोलिसांनी सुमारे १० लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून शाहिस्ता कुरेशी (रा. माढा कॉलनी, गुणवरे रोड बारामती, ता. बारामती, जि. पुणे) यांच्यावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, कुरेशीनगर (ता. फलटण) येथील नगरपालिकेच्या उर्दू शाऴेजवळ काल रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास शाहिस्ता कुरेशी यांनी त्यांच्या आयशर कंपनीचा चॉकलेटी रंगाचा टेम्पो (क्र. एमएच २५ यू ०९१५) यामध्ये २१ लहान अंदाजे ५ ते १० दिवसांची जर्सी गायीची नर जातीची काळी-पांढरे रंगाची वासरे व अंदाजे एक वर्षे वयाचे जर्सी गायीची नर जातीची काळ्या पांढर्या रंगाचे वासरू दाटीवाटीने कत्तल करण्याचे हेतूने बेकायदा डांबून ठेवल्याचे मिळून आले, अशी तक्रार पोलीस शिपाई काकासाो कर्णे यांनी शहर पोलिसात दिली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार विरकर करत आहेत.