गुणवरे ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये गणतंत्र दिन उत्साहात साजरा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. २८ जानेवारी २०२५ | फलटण |
‘भारत अमुचा प्राण, तिरंगा त्याची शान’ या उक्तीप्रमाणे ईश्वरकृपा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज गुणवरे येथे भारताचा ७६ वा गणतंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. संभाजी गावडे साहेब होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ईश्वरतात्या गावडे अध्यक्ष ईश्वर कृपा शिक्षण प्रसारक मंडळ यांनी भूषविले. संस्थेच्या सचिव साधनाताई गावडे उपस्थित होत्या. यावेळी श्री. संभाजी गावडे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी सिद्धी पिसाळ आणि तेजस्विनी ठणके यांनी केले. इयत्ता सहावी आणि नववीतील विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत, राज्यगीत, झेंडागीत उत्तमप्रकारे सादर केले.

इयत्ता सहावीतील कु. स्वरा शिंदे हिने भारतीय संविधान सादर केले. इयत्ता सातवी, आठवी आणि नववीतील विद्यार्थ्यांनी स्काऊट गाईड परेड करून शिस्तीचे प्रतीक दर्शवले. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय अंतर्गत घेण्यात येणार्‍या शुद्धलेखन, भाषण, चित्रकला, वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा अशा स्पर्धांचे ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच स्टेट लेवलमधील अबॅकस परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे एलिमेंट्री परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून ध्वजाला मानवंदना दिली. विद्यार्थ्यांनी मोरया, योगा डान्स, पिरॅमिड, तेरी मिट्टी, तसेच शेतकरी आत्महत्येवर आधारित नाटक सादर केले. इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी इंग्रजी, हिंदी, मराठी या भाषांमध्ये भाषणे करत आपला आतापर्यंतचा या शाळेतील प्रवास वर्णन केला तसेच शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी सातवी ते दहावीतील विद्यार्थ्यांचा आदर्श विद्यार्थी म्हणून त्यांना वही, गुलाबाची फुले देऊन उपस्थित प्रमुख पाहुणे आणि पालक वर्ग यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच संस्थेच्या सचिव सौ. साधना गावडे व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. संभाजी गावडे यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून ‘वंदे मातरम’ने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी सहकार्य केले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!