स्थैर्य, सातारा दि.२२: जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 42 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 1 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 4, विकासनगर 1, संभाजीनगर 2, गोडोली 1, करंजे 1, दौलतनगर 1, वाढे 1, वेणेगाव 1, लिंब 1,
कराड तालुक्यातील कराड 1, बनवडी 1, पोटले 1,चिखली शेरे 1,
पाटण तालुक्यातील पाटण 1,
फलटण तालुक्यातील फलटण 2, शुक्रवार पेठ 1, भाडळी 1, शिंदे वस्ती 1, मुरुम 1,
खटाव तालुक्यातील निमसोड 2, खातगुण 1,
माण तालुक्यातील पळशी 3, दिवड 1, म्हसवड 1, दहिवडी 1, मलवडी 1, गोंदवले 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 3,
जावली तालुक्यातील कुडाळ 1,
वाई तालुक्यातील बावधन 1,
खंडाळा तालुक्यातील शिरवळ 2, लोणंद 1,
इतर धोम 1, सोवडी 1,
1 बाधितांचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात येथे वाघोली ता. सातारा येथील 70 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
एकूण नमुने -276219
एकूण बाधित -54200
घरी सोडण्यात आलेले -51119
मृत्यू -1794
उपचारार्थ रुग्ण-1287