क्रिकेटपटू सुरेश रैना आणि अनेक सेलिब्रिटींसह 34 जणांवर गुन्हा दाखल


 

स्थैर्य, मुंबई, दि.२२: मुंबई विमानतळाजवळील ड्रॅगन फ्लाय क्लबवर पोलिसांनी सोमवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास धाड टाकली. क्रिकेटपटू सुरेश रैनासह 27 सेलेब्रिटीज आणि 7 स्टाफ मेंबर्स विरोधात IPC च्या 188, 269 आणि 34 कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यावेळी क्लबमध्ये अनेक सेलिब्रिटीज उपस्थित होते.

राज्यात सध्या लॉकडाउनचे नियम जारी आहेत. यानुसार रात्री 11 वाजेनंतर कोणत्याही प्रकारची पार्टी किंवा सार्वजनिक आयोजनावर बंदी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेडब्ल्यू मॅरियट स्थित ड्रॅगन फ्लाय क्लबवर डीसीपी जैन, पीआय यादव (गोडवी पोलिस स्टेशन) यांच्या पथकाने छापा टाकला. या पार्टीत 19 लोक दिल्लीहून आले होते. इतर लोक पंजाब आणि दक्षिण मुंबईतील रहिवासी होते. यातील बहुतांश लोक नशेत होते.

माहितीनुसार, या छापेमारी दरम्यान क्रिकेटपटू सुरेश रैना, गायक गुरु रंधावा, सुजैन खान (ऋतिक रोशनची पहिली पत्नी) येथे उपस्थित होते. पोलिस सूत्रांनी सांगितले, छापेमारी दरम्यान एक मोठा गायक क्लबच्या मागील गेटने फरार झाला. यामध्ये बादशाहचे नाव समोर येत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!