स्थैर्य, सातारा, दि. ०४ : जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 96 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
फलटण तालुक्यातील फलटण 6, मलठण 1, आनंद नगर 1, स्वामी विवेकानंद नगर 1, खुंटे 1,गुणवरे 2
सातारा तालुक्यातील सातारा 4, शाहुपुरी 4, मंगळवार पेठ 4,शनिवार पेठ 1, सदर बझार 1, जकातवाडी 1, पळशी 4,आसनगांव 1
कराड तालुक्यातील कराड 3, शनिवार पेठ 2, बेलवडे 1, गमेवाडी 1
जावळी तालुक्यातील कुडाळ 1
खटाव तालुक्यातील पोखारळे 2, पुसेगाव 3, नेर 12, निढळ 1, मायणी 3, वडूज 2,पळशी 1,वर्धनगड 2
माण तालुक्यातील सतरेवाडी 1, मार्डी 6, मोगराळे 1, विद्यानगर दहिवडी 1, गोंदवले बु.1, दहिवडी 4
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 9, झरेवाडी 1, पिंपोडे 1
खंडाळा तालुक्यातील लोणंद 1, शिरवळ 1, शेडगेवाडी 1
महाबळेश्वर तालुक्यातील शाहुनगर पाचगणी 1
2 बाधितांचा मृत्यु
स्व.क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय, सातारा येथे दिडवाघवाडी येथिल 50 वर्षीय महिला व जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये दहिवडी ता. माण येथील 74 वर्षीय महिला या दोन कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
एकूण नमुने -350400
एकूण बाधित -59268
घरी सोडण्यात आलेले -55909
मृत्यू -1859
उपचारार्थ रुग्ण-1500