जिल्ह्यातील 203 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ;12 बाधितांचा मृत्यु तर 1 ऑक्टोबर पासून खाजगी लॅबचे 212 जण बाधित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, सातारा दि.२४: जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 203 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 12 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. तसेच थायरोकेअर टेक्नॉलॉजिस् लि. नवी मुंबई या खाजगी लॅबचा दि. 1 ऑक्टोबर 2020 पासून 212 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातील सातारा 7, शनिवार पेठ 1, चिमणपूरा पेठ 1, शाहुपूरी 1, शाहुनगर 2, कोडोली 2, गोडोली 1, करंजे 1, मंगळवार तळे 2, सदरबझार 1, लिंब 2, खेड 1, चोरगेवाडी 2, जैतापूर 3, शेणोली 1, नागठाणे 5, देगांव 1, कृष्णानगर 1, रामनगर 1, अपशिंगे 1, चिंचणेर वंदन 1, विजय नगर 1, आदर्श नगर 1, जकातवाडी 1, काळोशी 1, खावली 1, पांडळी 1, कोंढवे 1, वाघजई 1,

कराड तालुक्यातील कराड 3, मंगळवार पेठ 3, शनिवार पेठ 1, मलकापूर 1, मसुर 1, करवडी 1, अटके 1, ओंड 1, शेवाळवाडी 1, कोडोली 1, गोंडी 1, उंब्रज 1, शेणोली 2, गिरजावडे 1, आगाशिवगनर 3, वडगांव 2, कासारशिरंबे 1, शेरे 1, कोपर्डे हवेली 2,

पाटण तालुक्यातील पाटण 1, भुडकेवाडी 1, बनपूरी 1, मेंढ 1, मालदन 1,

फलटण तालुक्यातील फलटण 1, लक्ष्मीनगर 3, कोळकी 1, राजुरी 1, कापशी 2, हिंगणगांव 2, खर्डेवाडी 1, विढणी 1, निरगुडी 1, काळज 2, तरडगांव 1,

वाई तालुक्यातील वाई 1, अनपटवाडी 1, सोनगिरवाडी 1, विरमाडे 1, बावधन 2, देगांव शिरगांव 1, खानापूर 2, धोमधरण 1, कवठे 1, 

खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1, लोणंद 3, विंग 1,

महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1, घावरी 1, 

खटाव तालुक्यातील खटाव 1, पुसेगांव 2, मोळ 1, नागनाथवाडी 1, मायणी 1, फडतरवाडी 1, वडुज 4, कटगुण 7, गुरसाळे 1,

माण तालुक्यातील दहिवडी 2, बिदल 2, म्हसवड 8, इंजबाव 1, बिजवाडी 1, देवपूर 1,

कोरेगाव तालुक्यातील कोरेगांव 4, नांदगिरी 2, देऊर 2, भोसे 2, मध्वपुरवाडी 1, किन्हई 1, पिंपरी 1, वाघोली 1, सासुर्वे 1, रहिमतपूर 5, वाठार स्टेशन 3, विखळे 1, वाठार कि. 4, पिंपोडे बु. 8,खेड 2, भातमवाडी 1,

जावली तालुक्यातील जावली 2, डुंड 1, बेलवडे 1,केळघर 1, कुडाळ 1,

इतर मसलवाडी 1, खिंडवाडी शिराळा 1, देविखींड 1, आरले 1, केडगांव 1,

बाहेरील जिल्ह्यातील नातेपुते (सोलापूर) 1, कडेपूर (सांगली), 

12 बाधितांचा मृत्यु 

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये मोरे कॉलनी ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष, विजयनगर ता. सातारा येथील 70 वर्षीय महिला, कुमटे ता. कोरेगांव येथील 95 वर्षीय पुरुष तसेच विविध खासगी हॉस्पीटलमध्ये माजगाव ता. पाटण येथील 70 वर्षीय महिला, तरडगाव ता. फलटण येथील 70 व 92 वर्षीय पुरुष, सदरबझार सातारा येथील 72 वर्षीय पुरुष तर रात्री उशीरा कळविलेले जामखेड रोड ता. सातारा येथील 64 वर्षीय पुरुष, निंबाळक ता. फलटण येथील 55 वर्षीय पुरुष, विरमाडे ता. वाई येथील 74 वर्षीय पुरुष, सदरबझार येथील 70 वर्षीय महिला, अनंत विहार ता. सातारा येथील 56 वर्षीय पुरुष अशा 12 एकूण कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

घेतलेले एकूण नमुने -179258

एकूण बाधित –45070

घरी सोडण्यात आलेले –38661

मृत्यू –1492  

उपचारार्थ रुग्ण-4917


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!