गोरगरिबांची अतिक्रमणे काढली आता बड्या धेंडाची अतिक्रमणे काढा अन्यथा आंदोलन छेडणार; खराडे व शिंदे यांचा फलटण नगरपालिकेला इशारा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्थैर्य, फलटण, दि. १० : फलटण शहरातील अर्धवट राहिलेली अतिक्रमण मोहीम पुन्हा चालू करावी. आतिक्रमण काढलेल्या जागेत पुन्हा अतिक्रमण झालेली ताडडतोब काढावीत अन्यथा सोमवार दिनांक २१ डिसेंबर २०२० पासून फलटण नगरपरिषदेच्या मुख्य दरवाजासमोर म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे व सामाजिक कार्यकर्ते मितेश उर्फ काकासाहेब खराडे यांनी निवेदनाद्वारे फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांना दिला आहे. 

सदरील निवेदनात शिंदे व खराडे यांनी असे म्हणाले आहे कि, फलटण शहरातील अतिक्रमण मोहिम बरेच दिवसापासून काही तांत्रिक कारणाने चालू होत नव्हती. परंतु सहा महिन्यापूर्वी नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी अतिक्रमण मोहिम चालू केली त्यावेळी सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, सर्वसामान्य जनतेने त्यांचे स्वागत केले. परंतु कोरोनाचे कारण पुढे करत अतिक्रमण मोहिम अर्धवट सोडण्यात आलेली आहे. अतिक्रमण मोहिमेत फलटण नगरपालिकेने गोरगरीब जनतेची अतिक्रमणे काढलेली आहेत. मात्र बड्या धेंडयाची अतिक्रमणे आहे अशीच राहील्याने व्यापारी व जनतेमध्ये फलटण नगरपरिषदने अन्याय केला असल्याची भावना निर्माण झालेली आहे. दरम्यान अतिक्रमण मोहीमेत अतिक्रमण काढलेल्या जागेत पुन्हा पक्क्या व कच्च्या स्वरूपाची बांधकामे वेगाने होऊ लागली आहेत. 

जास्त रहदारी असणाऱ्या चौकातील अतिक्रमण काढलेल्या पत्र्याच्या शेड खालील सिमेंटचे कठ्डे आहे तसेच असून रस्ता पूर्वीप्रमाणेच अरुंद राहिल्याने व त्याचा राडा रोडा अवती भवती पडल्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे फलटण नगरपरिषदेने अतिक्रमण काढण्याची केलेली मोहिम म्हणजे फक्त दिखाऊपणा तर नाही ना ? असा प्रश्न निर्माण होत आहे. म्हणून फलटण नगरपालिकेने कोणतीही सबबी न सांगता अर्धवट राहिलेली अतिक्रमण मोहीम ताबडतोब चालू करून बड्या धेंडांसह सरसकट अतिक्रमणे काढावीत असे हि शिंदे व खराडे यांनी निवेदनात स्पष्ट केलेले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!