स्थैर्य फलटण दि. 10: फलटण नगरपालिकेच्या वतीने शहरातील व्यावसायिकांसाठी सकाळी 11 ते 5 या वेळेत स्वतंत्र कचरा गाड्यांचे नियोजन करावे, अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.
- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -
टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज
शहरातील सर्व भागांमध्ये नगरपालिकेच्या कचरा गाड्या सकाळी लवकर येत असतात. परिणामी व्यवसायिकांना आपल्या दुकानाबाहेर ठेवलेला कचरा सदरच्या कचरा गाड्यांमध्ये टाकता येत नाही. त्यामुळे व्यवसायिकांना कचऱ्याची समस्या भेडसावत असून पालिकेने ही बाब लक्षात घेऊन व्यावसायिकांसाठी कचरा संकलन करण्याचे स्वतंत्र नियोजन आखावे अशी मागणी शहरातील व्यवसाय करत आहेत.